[go: up one dir, main page]

Jump to content

लॉरेंझो दे मेदिची

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

लॉरेंझो दे मेदिची हा इटलीतील [[फ्लोरेन्सचे प्रजासत्ताक|

लॉरेंझो दे मेदिची

फ्लोरेन्सचा]] अनभिषिक्त[] शासक होता. लॉरेंझो पेशाने राजकारणी, राजदूत होता. याने अनेक महान विद्वान, कवी आणि कलाकारांना पोसले. त्याला त्याचे समकालीन लॉरेंझो इल मॅग्निफिको (महान लॉरेंझो, इंग्लिश:लॉरेंझो द मॅग्निफिसन्ट) असे संबोधत. लॉरेंझोचा शासनकाळ हा इटलीतील प्रबोधनाचा सर्वोच्चबिंदू होता. त्याच्या मृत्यूनंतर फ्लोरेन्सच्या प्रजासत्ताकाचा सुवर्णकाळ अस्तास जाण्यास सुरुवात झाली. त्याने मोठ्या प्रयत्नाने इटलीतील संस्थानांमध्ये घडवून आणलेले तह त्याच्या मृत्यूनंतर लगेचच कोसळले आणि पुन्हा यादवीस सुरुवात झाली.

लॉरेंझोला फ्लोरेन्समधील मेदिची चॅपेलमध्ये दफन करण्यात आले आहे.

संदर्भ आणि नोंदी

[संपादन]
  1. ^ Kent, F.W. लॉरेंझो दे मेदिची अँड द आर्ट ऑफ मॅग्निफिसन्स (इंग्लिश). USA. p. 248.